अहो आश्‍चर्य : आता एका सेकंदात करा 30 सिनेमे डाऊनलोड


मिञांनो आता आपल्याला एखादा सिनेमा डाऊनलोड होण्यासाठी पुर्ण दिवसाची अथवा 4 ते 5 तास वाट बघावी लागणार नाही. कारण लवकरच आपल्याला 5 जी स्पीड अनुभवता येणार आहे. 3 जी आणि 4 जी नंतर  वायरलेस क्षेञातील ही सर्वात जास्त स्पीड असणार आहे. एका सेकंदात जवळपास 30 सिनेमे डाऊनलोड करण्याची या टेक्नॉलॉजीची क्षमता आहे. 5 जी स्पीड साठी 5 जी सपोर्ट करणारे मोबाईलच लागणार आहे. येथुन पुढे येणारे सिनेमा हे ब्ल्यु रे, 4 के इ. क्वालिटीचे असणार आहेत व यांना त्याच क्वालिटीत ऑनलाईन जरी बघायचे झाले तरी आपल्याला स्पीड ही जास्तच लागणार आहे. त्यामुळे हा शोध सर्वात महत्वाचा मानला जात आहे.

'युनिव्हर्सिटी ऑफ सरे'च्या शास्त्रज्ञांनी 5 जी इंटरनेट सेवेच्या तंत्रज्ञानाची प्राथमिक टेस्टिंग केली आहे. त्यातून हे समोर आले आहे की, 5 जीचा स्पीड हा 4 जीच्या स्पीडहून 65 हजार पटीने जास्त असणार आहे. या स्पीडमुळे तुम्ही एका सेकंदात जवळपास 30 सिनेमे डाऊनलोड करु शकता, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. 'युनिव्हर्सिटी ऑफ सरे'च्या रिसर्च टीमच्या माहितीनुसार, 5 जीने टेस्टिंगदरम्यान 125 गीगाबाईट्स एवढा स्पीड प्राप्त केले आहे. 

हे पहिल्यांदाच झाले आहे की, एखाद्या वायरलेसने एवढी वेगवान स्पीडची नोंद केली आहे. याआधी असा स्पीड फायबर ऑप्टिक केबलमध्ये पाहण्यात आला होता. 2018 मध्ये 5 जीच्या तंत्रज्ञानाची टेस्टिंग सुरु होणार असल्याची माहिती रिसर्च टीमने दिली आहे. ऑफ कॉम कंपनीचा दावा आहे की, 2020 पर्यंत 5 जी सेवा ब्रिटनमध्ये लॉन्च केली जाणार आहे.

Tags : internet 4G 5G hispeed fast internet

===============================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK