Breaking News

आनंदाची बातमी - पर्यटकांच्या सोयीसाठी खास व्हॉल्वो बसेस धावणार


पर्यटकांच्या सोयीसाठी आता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन व्हॉल्वो बसेस धावणार असून त्या येत्या पंधरा दिवसाच्या आत औरंगाबाद ते वेरुळ आणि औरंगाबाद ते अजिंठादरम्यान धावणार आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी ही मािहिती दिली. औरंगाबाद जिल्हा हा पर्यटनाची राजधानी म्हणुन ओळखला जातो. येथील ऐतिहासिक व प्रेक्षणिय स्थळांना भेटी देण्यासाठी तसेच त्यांचा अभ्यास करण्यासाठी विदेशातुन शेकडो पर्यटक औरंगाबादेत दाखल होतात.
औरंगाबादेतील पर्यंटन स्थळांना जाणे सोयीचे व्हावे यासाठी या दोन व्हॉल्वो बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. यातील एक बस दौलताबाद- वेरूळ- बीबीका मकबरादरम्यान धावेल. दुसरी औरंगाबाद ते अजिंठा मार्गावर धावेल. दोन्ही बस सकाळी जातील आणि रात्री परत येतील. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय टळेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. आतापर्यंत 80 टक्के काम झाले असून, आता वीज कनेक्शन घेणे शिल्लक आहे. त्यासाठी ४ लाख रुपये भरावे लागणार आहेत. हे कनेक्शनही लवकरच घेतले जाईल. साधारण पंधरा दिवसांच्या आत ही सुविधा सुरू होईल.
तसेच म्हैसमाळ येथे आता तंबुची व्यवस्था करण्यात येणार आहे यात 11 पर्यटकांना थांबणे शक्य होणार आहे. हे सर्व तंबु अत्याधुनिक पध्दतीने बांधण्यात येणार असून येथे सुरक्षा रक्षकही तैनात केला जाणार आहे. त्यामुळे म्हैसमाळच्या निसर्गसानिध्यात आपण राञही घालवू शकणार आहोत.

Tags : Travel Metro City, Aurangabad Travel, Travel Buses To Aurangabad, MaheshmalEllora, Ajanta, Ajanta-Travel

===============================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments