Breaking News

Search This Blog

सर्वसामान्यांच्या एसटीची हायटेक भरारी एसटी होणार वाय-फाय


जनसामान्यांची एसटी बस आता लवकरच कात टाकणार आहे आणि आपली एसटी आता वाय-फाय होणार आहे. लवकरच एसटीमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना या हायटेक सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यापुर्वीही आपण एसटीमध्ये टी.व्ही. चा अनुभव घेतला असेल पण आता टेक्नॉलॉजीच्या बदलत्या काळात सर्वांजवळ स्मार्टफोनरुपी करमणुकीचे साधन आले आहे आणि सर्व स्मार्टफोनमध्ये वाय फाय सुविधाही असते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी एसटीमधून प्रवास करावा यासाठी या नवीन तंञज्ञानाची निवड एसटी महामंडळाने केली आहे. 

या सुविधेमुळे प्रवाशंना ५ हजार गाणी, ५० हजार चिञपट आणि ५० मालिका पाहता येणार आहे. लांब पल्ल्याचा प्रवास कंटाळवाणा होऊ नए यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. यासाठी मोबाइलमधील हॉटस्पॉट (अ‍ॅप) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे एसटीतील एका वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. एसटीच्या बसमध्ये सेट टॉप बॉक्ससारखे यंत्र बसविण्यात येणार आहे. आणि ही सुविधा प्रवाशांना मोफत देण्यात येणार आहे येत्या चार ते पाच महिन्यात आपल्याला या सुविधेचा लाभ घेता येईल.

Tags : wi-fi bus, wifi st, hitech bus

===============================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadtravel.info 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments