Breaking News

लठ्ठपणा कंट्रोल करण्याचे काही नामी उपाय हे करा व लठ्ठपणाला कंट्रोल करा

  • लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रत्येक लठ्ठ माणूस कसोशीने प्रयत्न करत असतो. अगदी डायटिंगपासून मॉर्निंग वॉकपर्यंत. शिवाय व्यायामशाळेत जाणं वगैरे. पण हे सारं करुनही अनेकदा लठ्ठपणा कमी होत नाही किंवा कमी होण्यास मोठा कालावधी जातो. मात्र, आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. मात्र, हे उपाय सातत्याने करणं गरजेचे आहेत. शिवाय दररोज किंवा आठवड्यातून एकदा तरी वजन मोजणं गरजेचे आहे.
  • अनेकदा काय होतं की, डायटिंग वगैरे सुरु असते. खूप दिवस डायटिंग केल्यानंतर गती मंदावते. अनेकजण डायटिंगला कंटाळा करतात. मग लठ्ठपणा जैसे थे. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी सातत्य गरजेचे असते.
  • मुळात लठ्ठपणा कमी करायचा असल्यास सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे काय खायचे आणि किती खायचे, याबाबत जागरुक असणं गरजेचं आहे. पाणी जास्त प्यायलं पाहिजे. रोज कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. पाण्यामध्ये कॅलरी नसतात आणि पाणी प्यायल्याने भूकही कमी लागते. शिवाय, पाण्याने पोटही साफ राहते.
  • सकाळी एक चमचा मधाबरोबर लिंबाचा रस आणि एक ग्लास कोमट पाणी घ्यावे. रोजच्या आहारात सॅलड, ज्यूस, कांदा, टमाटे, मूळा, गाजर, काकडी. पत्ता कोबी असावे. यात कमी कॅलरी तर असतात. तद्वतच आवश्यक जीवनसत्वेही असतात.
  • आहारात तळलेले चटकार आणि गोड पदार्थ टाळावेत. जेवण करतांना आपले पूर्ण लक्ष जेवणावरच केंद्रीत करावे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री हलका आहार घ्या. जेवल्यानंतर लागलीच झोपी जाऊ नका. लगेच झोपल्यास कॅलरीच खर्च होत नाहीत. डायटिंग बरोबर व्यायाम केल्यास वजन कमी झाल्याचे लक्षात होईल.
===============================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadmetro.com 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments