Top Ad 728x90

Wednesday, October 21, 2015

,

पांढर्‍या केसांनी हैराण आहात ? केस पांढरे होण्यापासून रोखायचे काही जालीम उपाय

पांढर्‍या केसांनी हैराण आहात ? केस पांढरे होण्यापासून रोखायचे काही जालीम उपाय


मुंबई : पांढऱ्या केसांची समस्या अनेकांना असते. अगदी कमी वयातही केस पांढरे व्हायला लागले की मग अनेकांना अवघडल्यासारखं होतं. अशावेळी अनेकजण वेगवेगळ्या महागड्या औषधांचा वापर सुरु करतात, डॉक्टरच्या फेऱ्या मारतात. मात्र, या साऱ्यांमुळे केस आणखीच खराब होतात. मात्र, केस पांढरे होण्यापासून रोखायचे असल्यास काही घरगुती उपाय आहेत.

– आवळा केवळ तुमच्या शरीरासाठीच उत्तम आहे, असे नाही. केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठीही आवळ्याचा उपयोग होतो. आवळ्याला मेहंदीमध्ये मिसळून केसांना लावल्यास काळे केस पांढरे होण्यापासून रोखता येतं.


– काळ्या मिरचीच्या दाण्यांचं पाणी उकळावं. त्यानंतर ते उकळलेलं पाणी थंड करुन त्याने केस धुवावं. काळ्या मिरचीच्या दाण्याच्या पाण्याने केस सातत्याने धुवावं तरच त्याचा फायदा होईल.

– पांढऱ्या केसांना जर तुम्ही ब्लॅक टी किंवा कॉफीच्या अर्क वापरुन धुतल्यास पांढरे पडत चाललेले केस पुन्हा काळे होतात.

– हिना आणि दही यांना एकत्र करुन पेस्ट तयार करा. ही पेस्ट आठवड्यातून एकदा केसांना लावल्यास पांढरे केस काळे व्हायला सुरु होतात.

– कांदाही तुमचे पांढरे केस काळे करण्यास मदत करतो. अंघोळ करण्याच्या काही वेळ आधी कांद्याची पेस्ट केसांना लावावी. यामुळे पांढरे केस काळे होण्यास सुरुवात होते. विशेष म्हणजे कांद्याच्या पेस्टमुळे केस गळायचेही थांबतात.

===============================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadmetro.com 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

0 comments:

Post a Comment

Top Ad 728x90