Breaking News

संपुर्ण परीक्षा पध्दती ऑनलाईन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची तंञज्ञान क्षेञात भरारी


यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने त्यांची संपुर्ण परिक्षा पध्दती ऑनलाईन केली आहे. ज्यामुळे यापुढे परिक्षांच्या हॉल तिकीटापासून ते तपासणीपर्यंतची सर्व कामे या ई सुविधेमार्फत होणार आहे. अशा प्रकारच्या हायटेक यंञणेचा वापर करणारे हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. सुमारे ६ लाख ८४ हजार विद्यार्थी संख्या असलेल्या मुक्त विद्यापीठाचे राज्यात ८ विभागीय केंद्र असून ५६ शिक्षण अभ्यासक्रम घेतले जातात. या सर्व विद्यार्थ्यांची सोय व्हावी, कमी वेळात अचूक निकाल लावता यावे, यासाठी विद्यापीठाने परिक्षा पध्दतीत हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. वेबसाईटला व्हिजीट करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.


परीक्षांचे वेळापञक, हॉल तिकीट, अभ्यासांच्या नोट्स इत्यादी सर्व गोष्टी मोबाईलवर विद्यार्थ्यांना उपलब्ध्‍ा होणार आहेत. सर्व उत्तरपञिकांचे डिजिटायझेन करण्यात येणार असून त्यांचे संकलन तसेच तपासणीचे सर्व कार्य ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. या सर्वांमुळे वेळेचे योग्य नियोजन तसेच निकाल लवकरात लवकर विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्यास मदत होणार आहे. http://ycmou.digitaluniversity.ac  या वेबसाईटवर या संदर्भातली सर्व माहिती देण्यात आली आहे. संपूर्ण परिक्षा पध्दती ऑनलाईन करणारं मुक्त विद्यापीठ राज्यातलं पहिलं विद्यापीठ असल्याची प्रतिक्रिया कुलगुरु डॉ.माणिकराव साळुंखे यांनी दिली आहे.

Aurangabad Metro Online Media, Aurangabad =====================================================

a) All above content are copyright of respected owners
b) Please inform us if you have objection on any post
ADVERTISE WITH US !!!! 
- Thanku for Visiting http://www.aurangabadmetro.com 
- Join our Facebook Page https://www.facebook.com/AurangabadTravels
- Publish your unique Travel articles send them to ctindia2009@gmail.com 
- Advertise on This website contact ctindia2009@gmail.com 
- READ RELATED POST CLICK BELOW LINK

No comments