Breaking News

शेतीचे नवे तंत्र पाईपलाईन खोदाई यंत्र नक्की शेअर करा आपल्या मिञांसोबत


शेतीत पाईपलाईन टाकण्यासाठी एका दिवसात दोन किलोमीटरपर्यंत खोदाई करणा-या यंत्राबाबत शेतक-यांची उत्सुकता वाढली आहे. उत्तर भारतात मोठया प्रमाणात या यंत्राचा वाढतो आहे. पाईपलाईन खोदाई यंत्राची किंमत साडेचार लाखाच्या आसपास आहे. ट्रॅक्टरच्या मदतीने ते शेतात चालते. माती जशी असेल त्या प्रमाणेच या यंत्राकडून खोदाई होते. राजस्थानात 1200 पेक्षा यंत्र पुरविणारे श्री.मनोज सौनी यांनी सांगितले की, पाईपलाईन खोदाई यंत्राला मागणी वाढते आहे. दुष्काळामुळे दूर अंतरावरून पाईपलाईन करण्याचे प्रकार सर्व राज्यांमध्ये वाढत आहेत.
[post_ads]
राज्यात सध्या शेतात पाईप टाकण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर होतो. मात्र या मशीनमुळे अनावश्यक खोदाई देखील होते आणि शेतजमिनीचेही नुकसान होते. पाईपलाईन खोदाई यंत्रामुळे मात्र असे नुकसान टळते. या यंत्रामुळे 15 इंच रूंदीची आणि सहा फुटापर्यंत खोलीची नाली शेतातून खोदता येते. त्यात जास्तीत जास्त 12 इंच व्यासाचा पाईप टाकता येतो.


महाराष्ट्रातील शेतकरी किंवा शेतकरी गट देखील एकत्र येवून या यंत्राच्या सहायाने नवा व्यवसाय सुरू करू शकतात. यंत्राची माहिती किंवा प्रात्यक्षिकाच्या नियोजनासाठी 09602273666 या क्रमांकावर श्री.सौनी यांच्याशी संपर्क करता येईल.

================================================ 
Visit for All Latest & Breaking News in #Marathwada #Aurangabad #Nanded #Latur #Parbhani #Jalna #Beed #Hingoli #Osmanabad 
Like us on Facebook : https://www.facebook.com/AurangabadTravels 
Visit Daily : http://www.aurangabadmetro.com/ 

No comments