ऑनलाईन नोंदणी करा - MetroNews | Aurangabad News | Latest Aurangabad News | Latest Movies

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

ऑनलाईन नोंदणी करा

आपल्या औरंगाबाद शहराचे आपले मॅगझिन.

थोडक्यात महत्वाचे
इंटरनेटमुळे मानवी जीवनातील बहुतेक सर्वच व्यवहार अत्यंत सुलभ झाले आहेत. आणि आजतर इंटरनेट घराघरात नव्हे तर प्रत्येकाच्या मोबाईलवर व स्मार्टफोनवर पोहोचले आहे. आणि ग्राहकही स्मार्ट झाला आहे. प्रत्येक माहिती आता क्षणात लोकांच्या हातात पोहचते आहे. काहीही हवे असेल तर कोणीही सहजच इंटरनेटवर गुगल, याहू सारख्या सर्च-इंजिनवर शोधतो. नित्याच्या व्यवहारातील लाईटबील भरणे, फोनबील भरणे, बँकेचे व्यवहार, रेल्वेची तिकिटे काढणे, शॉपिंग करणे आदी कित्येक कामे घरबसल्या इंटरनेटवर होऊ लागली आहेत. कित्येक विषयांची अगदी इंत्यंभूत माहिती आज इंटरनेटवर उपलब्ध आहे. हे जरी खरे असले तरी अजूनही आपल्या औरंगाबाद शहरातील स्थानिक पातळीवरील कित्येक उद्योग / व्यवसाय / सेवा इंटरनेटवर पोहोचू शकल्या नाहीत. या कारणास्तव आपला ग्राहकवर्ग दुरावत चालला आहे. त्यामुळे एखाद्या शहरासाठी सर्च केल्यावर युजरला त्याच शहरातील त्याच्या गरजेची वस्तू किंवा सेवा मिळू शकत नाही. नेमकी हीच गरज लक्षात घेऊन आम्ही तयार केले औरंगाबाद व जवळच्या शहरांसाठी लोकल सर्च इंजिन (www.aurangabadmetro.com) की ज्यामध्ये त्या-त्या शहरातील सर्वच्या सर्व उद्योग / व्यवसाय / सेवांची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक शहरातील अगदी कानाकोप‍र्‍यातील अशा सर्व उद्योग / व्यवसाय / सेवांची माहिती नोंद करणे हा आमचा प्रयत्न आहे. जे करुन सर्वजण ऑलाईन उपलब्ध होऊ शकतील व लोकांना तात्काळ जी हवी ती वस्तु खरेदी करने सोप्पे होईल.

काय आहे www.aurangabadmetro.com
aurangabadmetro.com हे एक लोकल सर्च इंजिन आहे. ज्यामध्ये औरंगाबाद शहरातील व औरंगाबाद लगतच्या शहरातील छोट्या मोठ्या सर्व उद्योग, व्यवसाय, सेवांची माहिती इंटरनेटवर एकत्रित करण्याचा हा उपक्रम आहे. तसेच औरंगाबाद शहरात घडणार्‍या घडामोडींचे अपडेट थेट आपल्यापर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये स्थानिक लोकांना तर होईलच शिवाय जगाच्या पाठीवर कोणीही, कोठूनही घरबसल्या ही माहिती पाहणार आहे. तेंव्हा ज्या वेळेस आपण आपला व्यवसाय आमच्यासोबत रजिस्टर कराल तेंव्हा तो आमच्या साईटसोबतच गुगल, फेसबुक, व्टीटर वर असणार्‍या आमच्या हजारो फॅन्स पर्यंत व मोबाईलधारकांपर्यंत पोहचेल. याचा फायदा आपला ग्राहकवर्ग वाढविण्यास आपल्याला होणार आहे. आपल्या व्यवसायायाची एक छोटी वेबसाईटच याव्दारे बनविण्यात येणार आहे जी आपल्याला गुगलवरुनही शोधता येईल.

City, Category आणि एरियानुसार सर्च :
आमच्या या वेबसाईटवर औरंगाबाद शहरात सर्च करताना युजर गरजेप्रमाणे Category किंवा Area नुसार सर्च करू शकतो. उदा. समजा एखादा युजर प्लंबर या Category मध्ये सर्च करत असेल तर तो जवळच्या एरियावर क्लिक करून त्या एरिया मधील प्लंबर पाहू शकतो. म्हणजे वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक अशा कोणत्याही गोष्टींचा शोध युजर aurangabadmetro.com या वेब साईटवर घेऊ शकतो.

अत्यल्प दरात आपली प्रोफाईल वर्तमानपञ जाहिरातीपेक्षाही स्वस्त :
अवघ्या 2500 रुपयात स्वतःची प्रोफाईल आमच्या वेबसाईटवर बनवू शकता. या प्रोफाईल अथवा बिझनेस साईटचा पत्ता aurangabadmetro.com/businessname असा तयार होतो. या वेब साईटच्या पेजवर कोणतीही जाहिरात नसते. ही वेब साईट वरील पत्त्यावर डायरेक्ट ओपन होते. त्यासाठी पाहणाऱ्याला Login होण्याची गरज नसते. म्हणून हा पत्ता तुम्ही तुमच्या व्हिजिटिंग कार्ड आणि लेटरहेडवर छापू शकता. या प्रोफाईल वेब साईटच्या पेजवरील मजकूर, फोटो तुम्ही कधीही, कितीही वेळा बदलू शकता. हे वेब पेज केल्यानंतर सर्च रिझल्ट पेज वरील तुमच्या नावाचा कलर निळा होतो. तुमचे नाव लिस्टिंग मध्ये वेब पेज नसलेल्या नावांच्या वर येते. तिथे तुमच्या नावासमोरील View Profile ला तुमच्या प्रोफाईल वेब साईटची लिंक दिलेली असते. तिथे क्लिक केल्यावर डायरेक्ट तुमची प्रोफाईल वेब साईट ओपन होते. तसेच मोबाईल साठी लागणारे QR कोड ही आम्ही आपल्याला देतो जे तुम्ही वर्तमानपञातील जाहिरातीत वापरु शकता. जे करुन स्मार्टफोनव्दारे स्कॅन केल्यानंतर कोणताही ग्राहक तुमच्या ऑनलाईन प्रोफाईलपर्यंत पोहचु शकतो. हे सर्वकाही आपण करणार्‍या वर्तमानपञातील जाहिरातीपेक्षाही स्वस्त आहे.

अत्यल्प दरात लोकल डिस्प्ले जाहिराती : 
या वेब साईटवर सर्च रिझल्ट पेजवर उजव्या व डाव्या बाजूला 300px X 250px आकाराच्या डिस्प्ले जाहिराती आहेत.  युझर जो शब्द टाईप करून सर्च करतो तेंव्हा त्या ठिकाणी त्या शब्दाशी संबंधित category मधील त्याच शहरातील जाहिराती दिसू लागतात. आणि त्या जाहिरातीला त्या जाहिरातदाराच्या प्रोफाईल वेब साईटची लिंक दिलेली असते. म्हणजे त्या जाहिरातीवर क्लिक केल्यास त्या जाहिरातदाराची प्रोफाईल वेब साईट ओपन होते. उदा. समजा एखाद्या युजरने औरंगाबाद सिटी सिलेक्ट करून Mobile हा शब्द टाईप करून सर्च केल्यास सिटी मधीलच Mobile संबंधित सर्व व्यवसायांची नावे लिस्ट मध्ये दिसतात आणि मोबाईल संबंधित व्यावासायांच्याच जाहिराती उजव्या बाजूला डिस्प्ले होतात. जाहिरातदारांना इंटरनेट वर स्थानिक पातळीवर जाहिरातीचा हा सर्वोत्तम आणि एकदम स्वस्त पर्याय आहे. या जाहिरातींचा दरही महिन्याला फक्त रु. 1500/- इतकाच आहे.


⇛ Aurangabadmetro.com Contact Details
↓↓ Click on the following links & Get Latest Updates ↓↓

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages